शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (16:31 IST)

Old Woman Speaking Fluent English : कचरेवाल्या आजींची फाडफाड इंग्लिश

कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीची वेशभूषा बघूनच त्याच्या बद्दल आपले मत बनवून घेतो.परंतु आपण त्या व्यक्ती बद्दल केलेला विचार बरोबर आहे की चूक हे लक्षातच घेत नाही.म्हणून जो पर्यंत त्या व्यक्तीबद्दल पूर्णपणे माहिती नसेल त्याच्या बद्दल कोणता ही विचार करून आपले त्यांच्याबद्दलचे मत बनवणे सारासार चुकीचे आहे.असं केल्याने बरेच गैरसमज होऊ शकतात.असचं काही प्रत्यक्षात घडले आहे.बंगळुरू मधील एका महिले बद्दल.
 
सध्या या महिलेचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओ मध्ये ही महिला चक्क इंग्रजीतून संभाषण करताना दिसत आहे.ही महिला कचरा गोळा करण्याचं काम करते.
 
मिळालेल्या माहितीनुसार,या महिलेने 7 वर्ष जपान मध्ये काम केलं आहे.सध्या ती भारतात बेंगळुरू मध्ये रस्त्यावरून कचरा प्लास्टिक गोळा करण्याचे काम करते.या प्लास्टिकला विकून ती आपला उदरनिर्वाह करते.या महिले शी बोलताना तिने गाणं म्हणून देखील दाखविले.या महिलेचे नाव Cecilia Margaret Lawrence असे सांगण्यात आले आहे.काही लोकांनी तिची मदत करण्याची इच्छा दर्शविली आहे.