रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (11:10 IST)

जेव्हा खासदारच विसरले राष्ट्रगीत

मुराबादचे सपा खासदार डॉ. एस. टी. हसन 15 ऑगस्टला ध्वज फडकावल्यानंतर राष्ट्रगीतच विसरले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
 
लहान मुलांना देखील राष्ट्रीय प्रतीकांची जाणीव करुन दिली जाते. अशात एखाद्या लोकप्रतिनिधीची अशी वागणूक लज्जास्पद आहे. घडलं असं की खासदाराने गलशहीद पार्कमध्ये ध्वज फडकवताच प्रत्येकानं राष्ट्रगीत गायला सुरुवात केली, पण जेव्हा ते दुसर्‍या ओळीवर अडकले तेव्हा त्यांनी इकडे तिकडे पाहण्यास सुरुवात केली. घटनेचा व्हिडिओ व्हायल झाला आहे.
 
असं घडल्यावर ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी जय हे जय हे म्हणायला सुरुवात केली आणि बाकीचे देखील सरळ शेवटच्या ओळीवर गेले आणि कार्यक्रम संपवून निघून गेले. नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.