मंगळवार, 25 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑगस्ट 2021 (20:26 IST)

तालिबानच्या संकटावर सरकारची मोठी बैठक, सीसीएस बैठकीत पंतप्रधान मोदींनी शहा आणि डोभाल यांच्याशी विचारमंथन केले

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या संकटाच्या दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (सीसीएस) बैठक झाली. ही समिती सरकारची सर्वोच्च संस्था आहे जी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित समस्या हाताळते. गृहमंत्री अमित शहा,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशिवाय अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.अधिकृत सूत्रांनी बैठकीची पुष्टी केली परंतु बैठकीत काय चर्चा झाली यावर काहीही सांगितले नाही.
 
सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्या व्यतिरिक्त,अफगाणिस्तानमधील भारताचे राजदूत रुद्रेंद्र टंडन देखील या बैठकीत उपस्थित होते, जे आज हवाई दलाच्या विमानाने भारतात परतले.
 
अफगाणिस्तानात तालिबानचा ताबा झाल्यानंतर भारताने भारतीय राजदूत आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना दोन विमानांमध्ये परत आणले आहे. मात्र, अफगाणिस्तानात अजूनही अनेक भारतीय आहेत.याशिवाय अफगाणिस्तान हिंदू आणि शीख यांच्या सुरक्षेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.