शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पत्नी आणि मुलगी यांच्यातील वादामुळे परेशान होते भय्यु महाराज, मुलीच्या खोलीत स्वत:ला झाडली गोळी

राष्ट्रीय संत भय्यु महाराज यांच्या मृत्यूमुळे केवळ इंदूरच नव्हे तर देशातील त्यांच्या अनेक समर्थकांना धक्का बसला आहे. मंगळवारी त्यांनी आपल्या मुलीच्या खोलीत स्वत:च्या डोक्यावर पिस्तूल लावून आत्महत्या केली. भय्यु महाराज आपल्या दुसरी पत्नी डॉ. आयुषी आणि त्यांची मुलगी कुहु यांच्यात होत असलेल्या वादामुळे त्रस्त होते. महाराजांचे नातेवाईक व कर्मचारी यांनादेखील वादाची आशंका होती.
 
दुसरं लग्न केल्यापासून त्यांच्या बायको आणि मुलीत पटत नव्हतं. मुलगी नाराज होती म्हणून लग्नात सामील देखील झाली नाही. घरात रंगाई पुताई करताना कुहुच्या आईचे फोटो हटवण्यात आले त्यामुळे घरात वाद झाले होते. पुण्यात शिक्षण घेत असलेली कुहु इंदूर येणार होती परंतू तिची अव्यवस्थित खोली बघून देखील पती-पत्नी यांच्यात वाद झाला होता. 
 
संपत्ती वाद हे एक मोठं कारण असू शकतं असे मीडियात समोर येत आहे. त्यांचा दुसरा विवाह वादात असल्याचे जवळपासच्या लोकांना माहीत होते. 2015 मध्ये पहिली पहिली पत्नी माधवी यांच्या निधनानंतर त्यांनी डॉ. आयुषी शर्मा यांच्याशी 2017 मध्ये लग्न केले होते. संभवत: कौटुंबिक वादामागे दुसरी पत्नी कारण असल्याचं सांगितले जात आहे.
 
त्यांची मुलगी कुहु डॉ. आयुषी यांचा आई म्हणून स्वीकार करत नाही. तिला त्रासून वडिलांना हे पाऊल उचलले असतील, आयुषी यांना कोठडीत घाला असे कुहूने पोलिसांना म्हटले. 
 
पोलिसांना दिलेल्या वक्तव्यात पत्नी डॉ. आयुषी शर्मा यांनी म्हटले की कुहूला मी पसंत नाही म्हणून मुलीचा जन्म झाल्यावर मी आपल्या आईकडे राहत होते. कुहु पुण्याला गेल्यावर मी इंदूरला आले आणि आम्ही दोघे व्यवस्थित संसार करत होतो.
 
भय्यु महाराज यांच्या निधनानंतर सुमारे अडीच वाजता कुहु सिल्वर स्प्रिंग स्थित घरी पोहचली. ती खूप रागात होती. तिने घरात लागलेल्या डॉ. आयुषी यांचे सर्व फोटो हटवून दिले. 
 
इंदूर रेंजचे अतिरिक्त पोलिस महानिदेशक (एडीजी) अजय शर्मा यांनी सांगितले की भय्यु महाराज (50) यांच्या आत्महत्येच्या सुरुवाती चौकशीत कौटुंबिक वाद असल्याचे समोर येत आहे तरी आम्ही इतर बिंदूवर बारकाईने चौकशीत करत आहोत. आम्ही या प्रकरणात कोणत्याच परिणामावर पोहचण्याची घाई करणार नाही.