शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

राजकारणात होता भय्यु महाराजांचा मोठा प्रभाव

महाराष्ट्रातील राजकारणात मोठा प्रभाव असलेले तसेच राष्ट्रसंत म्हणून ओळख असणारे भय्यूजी महाराज यांनी इंदुर येथे गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यांनी जेव्हा गोळी झाडली तेव्हा त्वरित समजताच  त्यांना उपचारासाठी जवळच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल केले होते.  मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. भैय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख आहे. ते  ४८ वर्षांचे होते.  इंदूरमधल्या बापट चौकातील चौकामध्ये त्यांचा प्रसिद्ध आश्रम आहे. भय्यू महाराज यांच्या पहिल्या पत्नी माधवी यांचे निधन झाले असून त्यांना  कुहू नावाची मुलगी आहे. तर अनेक विरोध झुगारून त्यांनी  भय्यूजी यांनी दुसरे लग्न केले होते. राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव होता. भय्यूजी महाराज हे आध्यात्मिक गुरू होते. राजकारणामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये उत्तम ओळख होती.  चित्रपटक्षेत्र तसेच उद्योगक्षेत्रामध्ये देखील त्यांची बड्या मंडळींशी त्यांचे सल्ला घेत असत. अनेक भक्त  मार्गदर्शन घेण्यासाठी सातत्याने त्यांच्याकडे येत असायचे.  माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल तसंच अनेक सिने कलाकार त्यांच्या आश्रमात जायचे.
 
अण्णा हजारे उपोषणाला बसले असताना तत्कालीन सरकराने भय्यू महाराज यांना अण्णांचं उपोषण सोडविण्यासाठी पाठवलं 
भय्यू महाराज यांच्या हातून ज्यूस पिऊन अण्णानी उपोषण सोडलं 
गुजरातमधलं नरेंद्र मोदींचं सद्भवना उपोषण भय्यूजींच्या मध्यस्थीनेच सोडवण्यात आलं  
गुरुदक्षिणा म्हणून ते वृक्षारोपण करायचे आतापर्यंत त्यांनी 18 लाख झाडांची लागवड  
स्थापन केलेला ट्रस्ट 10 हजार मुलांना स्कॉलरशिप