गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (23:51 IST)

संरक्षण मंत्रालयाची मोठी घोषणा, आता हवाई दलात महिला फायटर पायलटची कायमस्वरूपी नियुक्ती

Big announcement from the Ministry of Defense
भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांच्या भरतीचा पायलट कार्यक्रम आता कायमस्वरूपी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, हा निर्णय भारताच्या महिला शक्तीच्या क्षमतांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महिला सक्षमीकरणासाठीच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
 
राजनाथ सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'भारतीय हवाई दलात महिला लढाऊ वैमानिकांच्या भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या पायलट योजनेला संरक्षण मंत्रालयाने कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.' सर्वोच्च न्यायालयाने प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केल्यानंतर काही महिन्यांनी हा निर्णय आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने प्रतिष्ठित नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) मध्ये महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केल्यानंतर काही महिन्यांनी हा निर्णय आला,  2018 मध्ये भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदीने एकट्याने लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास रचला. त्यांनी त्यांच्या पहिल्या एकट्या उड्डाणात मिग-21 बायसन उडवले होते.