मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2019 (16:17 IST)

चप्पल आणि सँडलचा वापर केला, तर तुम्हाला दंड भरावा लागेल

सध्या नवीन वाहतूक नियम आणि त्याचे वाढलेले दंड रक्कम यामुळे सामान्य नागरिक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. मात्र आता एक जुना नियम सुद्धा नागरिकांना दंड द्यायला कारणीभूत ठरू शकणार आहे. त्यात आता चप्पल आणि सँडल घालून जर बाईक चालवली तरीही दंड भरावा लागेल का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. बाईक चालवताना चप्पल आणि सँडलचा वापर केला, तर तुम्हाला दंड भरावा लागेल. चप्पल आणि सँडल घालून बाईक चालवणे हे ट्रॅफिक नियमांच्या विरोधात असून, हा खूप जुना नियम असून सक्तीने लागू करण्यात येत नव्हता. मात्र आता जर चप्पल, सँडल घालून बाईक चालवली तर दंड भरावा लागणार. गिअर असलेली बाईक तुम्ही चप्पल आणि सँडल घालून चालवली तरच तुमच्यावर कारवाई होऊ शकते असे असं ट्रॅफिक विभागाने सांगितले आहे. हा नियम फार पूर्वीपासून होता, मात्र त्यात दंड आकारणी केली जात नव्हती, आता मात्र ट्रॅफिक नियम कठोर केल्याने हा नियमही सक्तीने लागू करण्यात येत आहे. त्यामुळे गिअर बाईक चालवताना चप्पल किंवा सँडल घालणे प्रत्येकासाठी धोकादायक ठरु शकते. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा दंड भरायला तयार रहा.