शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 (16:15 IST)

मोदी ७ सप्टेंबरला मुंबईत, ३ मेट्रो मार्गांचे भूमीपूजन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात मुंबईत ३ मेट्रो मार्गांचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. गायमूख ते शिवाजी चौक, वडाळा ते जीपीओ मेट्रो तर कल्याण - तळोजा मेट्रो १२ या २५ किमी मार्गाचं भूमीपूजन पंतप्रधान करणार आहेत. सर्व मेट्रो मार्गांचं सुसूत्रीकरण करणारे, व्यवस्था ठेवणारे, नियंत्रण ठेवणारे मेट्रो भवनचे भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा असल्याने, हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
 
दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात कुठलेही भाजपा प्रवेश होणार नाहीत. मोदींच्या दौऱ्यात काही नेत्यांचा भाजपा प्रवेश होणार असल्याची चर्चा होती.