मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (09:40 IST)

गायी तस्करी कराल तर मराल - भाजपा आमदार अहुजा

पुन्हा एकदा भाजपा आमदार चर्चेत आले आहेत. यामध्ये आमदारांनी धमकी दिली आहे. यामध्ये नेहमीच राजस्थान येथील आमदार चर्चेत असतात. अश्याच प्रकारे  भाजपाचे आमदार ज्ञानदेव अहुजा त्यांच्या पुन्हा एकदा  एका वक्तव्यामुळे चर्चेत आले. यामध्ये ज्ञानदेव अहुजा यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आणि  नवा वाद ओढवून घेतला आहे. यामध्ये त्यांनी सरळ धमकी दिली असून ते म्हणतात की  गायींची तस्करी आणि हत्या करणाऱ्यांना लोकांचा मार खाऊन जीव गमवावा लागणार आहे.अलवार जिल्ह्यात गायींची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आले होते. झाकीर नावाचा एक व्यक्ती ट्रकमधून अवैधपणे गायींना कत्तलीसाठी घेऊन निघाला होता. यामध्ये  अलवरच्या खिलोरा गावाजवळ स्थानिकांनी झाकीरचा ट्रक पकडला होता. या गाडीमध्ये आठ गुरं होती. झाकीर गायींची तस्करी करत असल्याच्या संशयावरून जमावाने त्याला बेदम मारहाणही केली.पोलिसांनी वेळीच त्याला सोडवले होते. या घटनेला उद्देशून ज्ञानदेव अहुजा यांनी हे वादग्रस्त विधान केल्याची चर्चा सुरू झाली आहे.