गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 11 सप्टेंबर 2024 (10:01 IST)

भाजपने रचला मोठा विक्रम, आठ दिवसांत सदस्यत्व मोहिमेने दोन कोटींचा आकडा केला पार

Capital Delhi
भाजपने सदस्यत्व मोहीम सुरू केल्यानंतर अवघ्या आठ दिवसांतच पक्षाची सदस्यसंख्या दोन कोटींच्या पुढे गेली आहे. तसेच पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे म्हणाले की, 2 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाचे पहिले सदस्य बनून भाजपच्या राष्ट्रीय सदस्यत्व अभियानाची सुरुवात केली होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संघटन मंत्री बीएल संतोष यांनी नऊ राज्यांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या व सदस्यत्व मोहिमेचा आढावा घेतला.
 
या बैठकांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओरिसा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थानचे राज्य अध्यक्ष, सरचिटणीस, सदस्यत्व प्रमुख आणि सदस्यत्व संघाचे अधिकारी सहभागी झाले होते.