मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑगस्ट 2021 (10:26 IST)

भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचा राजकारणातून संन्यास

माजी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय फेसबुक पोस्ट लिहित जाहीर केला आहे. 
 
"राजकारणात न राहता देखील समाजकार्य करत राहणार आहे. कुठल्याही पक्षात जाणार नाही," असं सुप्रियो यांनी म्हटलंय.काँग्रेस, तृणमूल काँग्रेस किंवा सीपीएम यातल्या कोणत्याही पक्षानं बोलावलं नसल्याचंही सुप्रियोंनी स्पष्ट केलं.
 
"निवडणुकीअगोदरच पक्षाबरोबर माझे काही मतभेद होते, त्या गोष्टी निवडणुकीच्या अगोदरच सर्वांसमोर उघड झाल्या होत्या. पराभवाची जबाबदारी घेत आहे, परंतु दुसरे नेते देखील जबाबदार आहेत," असं बाबुल सुप्रियो यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
बाबुल सुप्रियो हे आपल्या खासदारकीचाही राजीनामा देणार आहेत.