गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 27 ऑक्टोबर 2024 (15:32 IST)

4 महिन्यांपूर्वी बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला,आरोपी प्रियकराला अटक

murder
उत्तर प्रदेश पोलिसांनी एका खुनाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी कानपूर जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या बंगल्याजवळून एका महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला.हा मृतदेह चार महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या महिलेचा असून तिच्या जिम ट्रेनर प्रियकराने तिचा निर्घृण खून केला आहे. मयत महिलेच्या आरोपी प्रियकराने गुन्हा कबूल केला आहे. आरोपी जिम ट्रेनर आहे. त्याने महिलेची हत्या करून तिचा मृतदेह सरकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या बंगल्याच्या परिसरात पुरला होता.

ही महिला 24 जून रोजी बेपत्ता झाली होती. महिलेच्या पतीने ती बेपत्ता असण्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. नंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यासाठी पुणे, आग्रा आणि पंजाब येथे पोलिसांची वेगवेगळी पथके पाठवण्यात आली.आणि पोलीस कानपूरला आरोपी पर्यंत पोहोचली. आरोपीने सांगितले की तिचे महिलेशी प्रेम संबंध असून ती विवाहित असून लग्नापासून खुश नव्हती. 

घटनेच्या दिवशी दोघे एका कार मध्ये बसलेले होते. नंतर त्यांच्यात संभाषणाच्या दरम्यान वाद झाला आणि आरोपीने महिलेच्या मानेवर मारले त्यात ती बेशुद्ध झाली नंतर तिचा खून करून तिचा मृतदेह पुरवला.सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोघेही जिम मधून एकत्र  बाहेर पडताना दिसत आहे. 
Edited By - Priya Dixit