मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथे, वडोदरा येथील पद्रा आणि आणंद जिल्ह्यांना जोडणारा महिसागर नदीवर बांधलेला ४५ वर्षे जुना पूल आज सकाळी कोसळला. यामुळे तेथे खळबळ उडाली. या घटनेत, पुलावरून जाणारे दोन ट्रक, एक बोलेरो आणि एक जीपसह चार वाहने माही नदीत पडली. पूल कोसळल्यामुळे, एक टँकर अजूनही पुलावर लटकत आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. तसेच, आतापर्यंत तीन जणांना वाचवण्यात आले आहे. हा अपघात घडताच मुजपूरसह जवळच्या गावातील लोकांची गर्दी घटनास्थळी जमली होती. यासोबतच पद्रा पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून कारवाई सुरू केली.આણંદ અને વડોદરા જિલ્લાને જોડતો મુખ્ય ગંભીરા બ્રીજ તૂટી પડ્યો છે.અનેક વાહનો નદીમાં પડતા મોટી જાનહાનિ થઈ હોવાની શક્યતા છે. સરકારી તંત્ર તાત્કાલિક બચાવ કામગીરી હાથ ધરે અને ટ્રાફિક માટે વૈકલ્પિક વ્યવસ્થા કરવામાં આવે.@CMOGuj @dgpgujarat @Bhupendrapbjp @sanghaviharsh @CollectorAnd pic.twitter.com/Xn1vIB9QEs
— Amit Chavda (@AmitChavdaINC) July 9, 2025