सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (11:37 IST)

प्रयागराजमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ उडाली

murder
प्रयागराज शहरापासून 35 किमी अंतरावर असलेल्या नवाबगंजमध्ये आज एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. नवाबगंज पोलीस स्टेशन हद्दीतील खगलपूर गावात भाड्याने राहणाऱ्या राहुल तिवारी (४२), त्याची पत्नी प्रीती (३८) आणि माही, पिहू आणि पाहू या ५, ७ आणि १२ वर्षांच्या तीन मुलींना ठार मारण्यात आले. शनिवारी सकाळी एकाच खोलीत पाच मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.
 
एसएसपी व्यतिरिक्त अनेक पोलीस ठाण्यांचे फोर्स आणि श्वान पथक खगलपूर गावात पोहोचले आहे. मृत कुटुंब भारवारी कौशांबी येथील रहिवासी आहे. घरप्रमुख राहुल तिवारी याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सर्वांची झोपेतच हत्या करण्यात आली आहे. फिंगर प्रिंट तज्ञही पोहोचून तपास करत आहेत. या घटनेची छायाचित्रे हृदय हेलावून टाकणारी आहेत.