मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (21:50 IST)

गर्भवती महिलेची टॉयलेटमध्ये प्रसूती, कमोडमध्ये अडकले बाळ, 25 मिनिटांत बाळाची सुटका केली

आज राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त अग्निशमन दलाच्या जवानांनी एका नवजात अर्भकाचे प्राण वाचवले. अहमदाबादच्या पालडी भागातील एका विकास गृहात एका मतिमंद गर्भवती महिलेचे बाळ प्रसूतीदरम्यान कमोडमध्ये अडकले. टॉयलेटच्या कमोडमध्ये नवजात अर्भक अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. तत्काळ नवरंगपुरा येथील इमर्जन्सी रेस्क्यू टीम तेथे पोहोचली आणि मुलाची स्थिती पाहून मणिनगरच्या आपत्कालीन बचाव पथकालाही पाचारण करण्यात आले.
 
फरशा फोडून मुलाला बाहेर काढण्यात आले
मुलाचे तोंड कमोडमध्ये अडकल्याने अग्निशमन दलाने तात्काळ बचावकार्य सुरू करून मुलाला वाचवले. मुलाला दुखापत होणार नाही याची काळजी घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रथम स्वच्छतागृहाच्या आजूबाजूच्या फरशा फोडल्या. आजूबाजूच्या फरशा तोडून मुलाला बाहेर काढण्यात आले.
 
मुलाला कोणत्याही प्रकारे इजा झाली नाही
मूल हवेत होते आणि त्याचे तोंड अजूनही आत अडकले होते त्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचे पाईपचे कनेक्शन काढून टाकण्यात आले. नंतर हळूहळू कमोडचा काही भाग तुटून मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाने अवघ्या 25 मिनिटांत बालकाची सुटका करून पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवले. सुदैवाने मुलाला दुखापत झाली नाही.