बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (15:31 IST)

राणीच्या बागेत पेंग्विनचा जन्म

मुंबईत राणीच्या बागेत पेंग्विनचा जन्म झालाय. स्वातंत्र्य दिनी संध्याकाळी हा पेंग्विन जन्माला आला. भारतात जन्म घेणारा तो पहिला पेग्विंन ठरला आहे. राणीच्या बागेत सुखानं संसार थाटलेल्या मोल्ट आणि फ्लिपर यांनी त्यांच्या बाळाला जन्म दिला आहे. पेंग्विनने अंडे दिल्यानंतर 40 दिवसांनी अंड्यातून पिल्लू बाहेर येतं. हा इन्क्युबेशन पिरिएड 14 ऑगस्ट रोजी संपला आणि 15 ऑगस्ट रोजी रात्री अंड्यातून पिल्लू बाहेर पडलं. हे पिल्लू सुखरुप बाहेर पडल्याने आई फ्लिपर आणि बाबा मोल्ट देखील खूश आहेत. प्राणिसंग्रहालयात दोन वर्षांपूर्वी 26 जुलै 2016 रोजी हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले आहेत.