गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

बाप्परे, तब्बल १२ वर्षांनंतर 'या' बेटावर बाळाचा जन्म

ब्राझीलमधील फर्नांडो डी नारोन्हा या बेटावर तब्बल १२ वर्षांनतर बाळाचा जन्म झाला आहे. या बेटाची लोकसंख्या जवळपास तीन हजार आहे. मात्र या ठिकाणी मुलांना जन्म देण्यास बंदी असल्याने एकही प्रसुतीगृह नाही. हे बेट जगातील सुंदर द्विपकल्पांपैकी एक आहे. या बेटावर ब्राझीलमधील प्रसिद्ध अभयारण्य आहे. या अभयारण्यात अनेक दुर्लभ प्राणी, पक्षी तसेच वनस्पती आहेत. या वन्यजीवांच्या रक्षणासाठी बेटावर लोकसंख्या नियंत्रणाचे अत्यंत कडक निर्बंध आहेत.
 
या गावातील २२ वर्षांच्या महिलेने घरामध्येच मुलीला जन्म दिलाय. ‘आपण गर्भवती आहोत याची कल्पनाच नव्हती. हे समजले तेंव्हा धक्का बसला’असे या महिलेने सांगितले. मुलीचा जन्म होताच घरच्यांनी महिलेला बाळासह गावातील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनानेही मुलीचा जन्म झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे.