शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (13:43 IST)

Cadbury : कॅडबरी मध्ये आढळली जिवंत आळी, कंपनी म्हणाली

chocholate
चॉकलेट खाणं सर्वांनाच आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत चॉकलेटचे प्रेमी सर्वच असतात. चॉकलेटच्या क्षेत्रात नावाजलेल्या ब्रँड असलेल्या कॅडबरीच्या डेअरी मिल्क मध्ये चक्क जिवंत आळी आढळाई. याचा व्हिडीओ एका ग्राहकाने पोस्ट केला आहे. 

रॉबिन झेकीयस नावाच्या व्यक्तीने डेअरी मिल्क मध्ये जिवंत आळी असल्याचा दावा करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. अमीन पेटमधील रत्नदिप मेट्रो मधून खरेदी केलेल्या कॅडबरी डेरीमिल्क मध्ये चक्क जिवंत आळी सापडली. या चॉकलेटची एक्स्पायरी डेटपण जवळची आहे. हे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणं आहे. यांचा साठी जबाबदार कोण असा प्रश्न केला जात आहे.  

रॉबिन ने शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये कॅडबरी डेअरी मिल्कचा अर्धवट फाडलेला रॅपर मध्ये जिवंत आळी चालताना दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये खरेदीचे बिल देखील दिले आहे. 

यावर कॅडबरी कंपनीने देखील उत्तर दिल आहे. कंपनी म्हणाली, नमस्कार. मंडेलेज इंडिया फूड प्रायव्हेट लिमिटेडनेहमीच उत्पादनांचा उच्च दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील असते. तुम्हाला आलेल्या वाईट अनुभवासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी कृपया तुमची तक्रार [email protected] वर पाठवा. त्यासोबत तुमचं पूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि खरेदीची माहिती द्या”, अशी विनंती कंपनीकडून संबंधित ग्राहकाला करण्यात आली आहे.
 
Edited By- Priya Dixit