शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 जून 2022 (17:08 IST)

14 पिकावरील एमएसपी वाढवण्यास केंद्राची मंजुरी शेतकऱ्यांना दिलासा !

modi farmers
Cabinet Decision on MSP: केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2022-23 पीक वर्षासाठी धानाचा एमएसपी 100 रुपयांनी वाढवून 2,040 रुपये प्रति क्विंटल केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, "पेरणीच्या वेळी एमएसपीची माहिती घेतल्याने शेतकऱ्यांचे मनोबलही वाढते आणि त्यांना पिकाला चांगला भावही मिळतो." यावेळी सर्व 14 खरीप पिके आणि त्यांच्या वाणांसह 17 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे की 2022-23 च्या खरीप विक्री हंगामासाठी 14 पिकांचा एमएसपी निश्चित करण्यात आला आहे
 
या व्यतिरिक्त, भारत सरकार लवकरच व्यापाऱ्यांना सुमारे 1.2 दशलक्ष टन गहू पाठवण्याची परवानगी देण्याचा विचार करू शकते
 
गेल्या महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर अचानक बंदी घातल्यानंतर बंदरांवर अडकलेला माल सरकारला काढायचा आहे. मात्र, सरकारच्या परवानगीनंतरही सुमारे 5 लाख टन गहू बंदरांवर अडकून पडण्याची शक्यता आहे. याचे कारण व्यापाऱ्यांना निर्यात परवाने मिळू शकत नाहीत.
 
केंद्रीय मंत्रिमंडळाने तूर डाळीच्या एमएसपीमध्येही वाढ केली आहे. यावेळी अरहर डाळ (तूर) चा एमएसपी 6600 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. गेल्या वेळेपेक्षा यंदा एमएसपी प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.
 
तिळाच्या दरात 523 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुगाच्या भावात प्रतिक्विंटल 480 रुपयांची वाढ होणार आहे. सूर्यफुलावर प्रतिक्विंटल 358. भुईमुगाच्या दरात 300 रुपयांची वाढ होणार आहे.