रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जून 2018 (08:56 IST)

चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर

व्हिडिओकॉन या कंपनीला कर्जे दिल्याच्या प्रकरणावरून वादात अडकलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. कोचर यांच्या जागी संदीप बक्षी हे बँकेचे नवे पूर्णवेळ संचालक असणार आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने बक्षी यांच्या नावावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे बँकेच्या माजी संचालक चंदा कोचर या सुट्टीवर गेल्या असून त्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या सुट्टीवरच असणार आहेत. एएनआयने या वृत्तसंस्थेनेबाबत वृत्त दिले आहे.
 
यापूर्वी पीएनबी महाघोटाळ्याप्रकरणी सीरिअस फ्रॉड इन्विस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ)ने आयसीआयसीआयच्या प्रमुख चंदा कोचर यांना नोटीस पाठवली होती.