गुरूवार, 25 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (15:35 IST)

नोटाबंदी बँकिंग क्षेत्राच्या पथ्यावर

Demonetization
गतवर्षी 8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली नोटांबदी सर्वसामान्यांसाठी फारशी लाभदायक ठरली नसली तर बँकिंग क्षेत्राला मात्र चालना देणारी ठरली आहे. नोटाबंदीनंतर बाद झालेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी लागलेल्या रांगांमुळे बँकांमध्ये जमा रकमेत भर पडली असून अलिप्त राहिलेल्या पैसा बँकिंग क्षेत्राच्या सर्वसाधारण अखत्यारित आला असल्यामुळे आमच्या क्षेत्रासाठी तरी नोटाबंदी वरदान ठरल्याची प्रतिक्रिया आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोच्चर यांनी व्यक्त केली आहे. 500 आरि 1 हजारांच्या नोटा चालनातून बाद करण्यात आल्यामुळे जनतेने आपल्याकडील सर्वच सर्व नोटा बँकेट जमा केल्या त्यामुळे बँकेतील वाहते भांडवल मोठ्या प्रमाणात वाढले. त्या मागील हेतू, उद्दिष्ट साध्य होवो की न होवो, नोटाबंदी बँकिंग क्षेत्रासाठी सकारात्मक ठरल्याचे भाष्य एसबीआयचे अध्यक्ष रजनिशकुमार यांनी केले आहे. नोटाबंदीतून काहीच साध्य झालेले नसल्यामुळे विरोधी पक्षांकडून हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे.