रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 जून 2018 (17:26 IST)

पत्नीच्या आठवणी म्हणून चक्क बांधल मंदीर

तेलंगणात एका पतीने चक्क दिवंगत पत्नीची आठवण म्हणून तिचं मंदिर उभारलं आहे. तो रोज त्या मंदिरात जातो आणि पत्नीच्या मूर्तीची पूजा करतो. चंद्र गौड असे त्याचे नाव असून राजमणी हे त्याच्या पत्नीचे नाव आहे. आता हे मंदिर बघण्यासाठी रोज शेकडो लोकं येथे गर्दी करू लागले आहेत.
 
तेलंगणा येथील सिद्दीपेत जिल्हयात हे दाम्पत्य राहत होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेमही होते. चंद्र गौड हे वीज विभागात काम करत होते. निवृत्तीनंतर पत्नीबरोबर पुढील आयुष्य शांततेत घालवावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र एका दुर्धर आजारात राजमणी यांचा मृत्यू झाला. यामुळे चंद्र गौड एकदमच खचले. त्याचवेळी त्यांना एक कल्पना सुचली. पत्नीवरचे प्रेम निरंतर जिवंत रहावे यासाठी त्यांनी तिचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. चंद्र यांच्या या निर्णयाला घरच्यांनी विरोध केला आणि खिल्ली उडवली. पण चंद्रगौड आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी सिद्दीपेत जिल्हयात दुब्बका मंडळात राजमणीचे मंदिर उभारले. त्यात तिची हूबेहूब मूर्ती ठेवली आहे.