सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 18 जून 2018 (17:11 IST)

जिथे मेहनत, तिथे यश, मिळाली 3.8 कोटींची शिष्यवृत्ती

उत्तरप्रदेशातील बुलंदशहर येथील एका चहा विक्रेत्याच्या मुलीला अमेरिकेतील प्रतिष्ठित महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. सुदीक्षा भाटी असे या मुलीचे नाव असून सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत 98 टक्के मार्क्स मिळविले आहेत. ती जिल्ह्यात पहिली आली आहे.  गरिबीवर मात तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिला ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. आता तिला पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील बॉबसन महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. या चार वर्षाच्या कोर्ससाठी तिला 3.8 कोटींची शिष्यवृत्तीही मिळाली आहे.
 
यावेळी सुदीक्षा भाटी म्हणाली की, सुरुवातीला शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न मला कठीण वाटत होते. 2011 मध्ये मला विद्याज्ञान लीडरशीप अकादमी शाळेत प्रवेश मिळाला. त्यानंतर शिक्षण सुरू ठेवणे मला सोपे झाले. 
 
विद्याज्ञान लीडरशीप अकादमीची स्थापना 2009 मध्ये शिव नडार फाउंडेशनकडून करण्यात आली आहे. सद्दस्थितीला बुलंदशहर आणि सीतापूरमधील 1900 हून अधिक गरीब कुटुंबातील मुले या अकादमीत शिक्षण घेत आहेत.