शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2023 (12:03 IST)

छत्तीसगड :मोबाईलवरून मुलीची धबधब्यात उडी,सुदैवाने बचावली

social media
छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी धबधब्यात उडी मारताना ज्या कोणी पाहिलं त्याला धक्काच बसला.

हा व्हिडिओ बस्तर विभागातील चित्रकूट धबधब्याचा आहे. उडी मारलेल्या मुलीला तिच्या कुटुंबीयांचा काही गोष्टीचा राग होता, अशी माहिती मिळाली आहे. तिने रागाच्या भरात येऊन चित्रकुटच्या धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.मात्र सुदैवाने तिला वाचविण्यात यश आले. सरस्वती मौर्य असे या तरुणीचं नाव आहे.
 
ती सतत मोबाईल वापरायची.त्यावरून तिच्या घरातील मोठे तिला बोलायचे रागवायचे. मंगळवारी सरस्वतीचे वडील तिला मोबाईलवरून ओरडले.तिला राग आला आणि ती घरातून बाहेर पडली आणि तिने चित्रकूट धबधबा गाठला. 

तिला धबधब्याच्या टोकावर उभे पाहून तिथे आलेल्या लोकांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने दुर्लक्ष करून धबधब्यातून उडी टाकली. नंतर ती स्वतःला वाचविण्यासाठी प्रयत्न करू लागली.
तिला उडी टाकलेली पाहून सुरक्षेसाठी बसलेले गावकऱ्यांनी बोट नेऊन तिला वाचवले. सुदैवाने तिला वाचविण्यात यश आले.  
 
Edited by - Priya Dixit