1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Cloudburst near Amarnath cave, 5 killed, NDRF, ITBP involved in rescue operation

अमरनाथ गुहेजवळ ढग फुटी , 5 जणांचा मृत्यू, NDRF, ITBP बचावकार्यात गुंतले

Cloudburst near Amarnath cave
जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेजवळ संध्याकाळी ढगफुटी झाली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. मात्र, बेपत्ता लोकांची संख्या उघड झालेली नाही. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आयटीबीपीचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.  
 
ढगफुटीनंतर टेन्ट मधून ओहोळ वाहू लागला, त्यानंतर भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. अनेक लोक त्याच्या कचाट्यात आले होते.  काही लोक वाहून गेले आहेत की नाही हे पाहण्यासाठी मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली टीम आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बालटालच्या वाटेवर आयटीबीपी आणि 
एनडीआरएफची टीमही येथे तैनात करण्यात आली होती. तेथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात श्राइन बोर्डाकडून हेल्पलाइनही जारी करण्यात येणार आहे. ज्यांचे नातेवाईक तेथे गेले आहेत, त्यांना त्या क्रमांकावरून माहिती मिळू शकते 
आज सुमारे 8-10 हजार लोक या प्रवासात सहभागी झाले होते. भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. याच दरम्यान ही घटना घडली आहे . एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या ढगफुटी मध्ये अद्याप किती लोकांचा मृत्यू झाला आहे. याची पुष्टी करता येऊ शकत नाही.  बीएसएफ, सीआरपीची वैद्यकीय पथकेही तेथे उपस्थित आहेत. 
पुढील लेख
Malaysia Masters 2022: एचएस प्रणॉय उपांत्य फेरीत , पीव्ही सिंधू स्पर्धेतून बाहेर