1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Coins, blades, needles found in MP man stomach

तरुणाच्या पोटात मिळाली 236 नाणी आणि 150 खिळे

रिवा: लहान मुलाने चुकून तोंडात एखादे नाणे टाकले आणि ते पोटात गेले असे आपण ऐकतो. अशावेळी त्याच्या घरातील मंडळी घाबरुन जातात परंतू आता ही गोष्ट ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. 
 
एका तरुणाच्या पोटात एक-दोन नाही तर तब्बल 236 धातूची नाणी आणि 150 खिळे सापडले आहेत. आता हे इतके सगळे त्याच्या पोटात गेले कसे असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडेल. तर या मुलाला धातूच्या वस्तू खाण्याची आवड असल्याने तो अशाप्रकारे धातूच्या अनेक गोष्टी खात होता. यामध्ये नाणी आणि खिळ्यांशिवायही अनेक गोष्टी होत्या. कुत्र्याला बांधण्याची एक स्टील चेन, सेफ्टी पिन्स आणि धातूची एक पट्टी पोटात असल्याचे त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर कळाले.
 
मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यात ही अतिशय आश्चर्यकारक अशी घटना घडली आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या तरुणाला नैराश्य आले होते.
पुढील लेख
नेतागिरी करणारा रोबा लढणार निवडणूक