बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ब्लू व्हेल गेमचा आणखीन एक बळी

मध्यप्रदेशमधील दमोहमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थांने धावत्या रेल्वेसमोर येऊन आत्महात्या केली आहे. ह्या आत्महत्येचे कारण ब्लू व्हेल गेम आहे. या खेळामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला ५० दिवसांसाठी ५० आव्हाने दिली जातात. ज्यामध्ये शेवटचा टप्पा हा आत्महत्याच आहे. दमोह शहरातील नवजागृती शाळेत शिकणाऱ्या सात्विक उर्फ राम पांडेने रात्री उशीरा ट्रेनसमोर येऊन आपला जीव दिला.

मृत सात्विकच्या वर्गमित्रांनी सांगितले की, तो ब्लू व्हेल गेम खेळत होता. आत्महत्या करण्यापूर्णी त्यानं इतर मित्रांनाही हा गेम खेळण्याचा आग्रह केला होता. याबाबत सात्विकच्या घरच्यांनी अथावा शाळेतील शिक्षकांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. सात्विकचा आत्महत्या करतानाचा सीसीटिव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये तो रेल्वे पटरीवर उभा असल्याचे दिसत आहे. त्यावेळी समोरुन ट्रेन त्याला उडवून गेल्याचे दिसतेय.