ब्लूव्हेल गेमच्या नावे मुलांना आत्महत्या करायला लावणाऱ्या या गेमच्या मास्टरमाईंडला अटक झाली आहे. यामध्ये असे आहे की अटक करण्यात आलेली आरोपी ही 17 वर्षाची मुलगी आहे. त्यामुळे पोलिसांना मोठाधक्का धक्का बसलाआहे. ब्लू व्हेल गेम चॅलेंजमागे तिच असल्याचा पोलिसांचा सांगितले आहे. या मुलीने अनेक घातक अश्या गेमच्या स्टेप केल्या होत्या आणि ते त्यात मुलांना अडकवत होती. तर शेवटची स्टेज ही आत्महत्या अशी होती. जगात आणि आपल्या देशात सुद्धा अनेक मुलांनी या गेममुळे आत्महत्या केल्या आहेत.
पोलिसांनी आरोपी तरुणीला तिच्या घरातून अटक केली. आरोपी मुलगी मनोविज्ञानाची विद्यार्थिनी आहे. रशियन पोलिसांनी तिचे नाव गुप्त ठेवले आहे. इतर मास्टर सुद्धा आता पोलिस शोध घेत आहे. या मुलीला पोलिसांनी Khabarovsk Krai या रशियन प्रांतातून अटक केली आहे. यामध्ये रशियाचे मंत्री कर्नल एलिना वोल्क यांनी माध्यमांना सागितले की हा खेळ एका मुली ने नाही तर अनेकांनी एकत्र येत तयार केला आहे, या आगोदर यामधील टास्क तयार करणारा फिलीप बुडेकीन ला पोलिसांनी अटक केली आहे. आम्ही इतर लोकांना लवकरच पकडणार आहोत.
काय आहे ‘ब्ल्यू व्हेल’ गेम?
हा गेम म्हणजे एक गूढ आहे. हा डाऊनलोड होत नाही तर याची सेटिंग पसरवली जाते. यामध्ये जो खेळ खेळतो त्याला एक टास्क दिली जाते देणारा असतो मास्टर. मग स्वतःरक्ताने शरिरावर देवमास अर्थात ब्लू व्हेल तयार करवा लागतो.मग मास्टर सांगेल तसे कराव लागेते जसे, रात्री दिवसा कोठेही फिरणे, घरातून पळून जाणे किंवा मुलीनी स्वतः आपला नग्न व्हिडियो बनविणे, सेल्फी घेणे शरीरावर जखमा करणे, दिवसभर हॉरर फिल्म पाहणे, रात्रभर जागणे असे होय. त्यामुळे एक एक स्टेज पार करत खेळणारा पूर्णतः अडकतो आणि नैराश्याच्या गर्तेत अडकतात. मग मास्टर प्लेअरवर 50 दिवस कंट्रोल ठेवतो. खेळाची शेवटची स्टेज सर्वात भयानक आहे ती म्हणजे आत्महत्या करण्याचं आव्हान देण्यात येते.तर अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत.