बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

युपी गोरखपूर दुर्घटना : डॉक्टर खानला अटक

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बीआरडी हॉस्पिटलमध्ये 10 आणि 11 ऑगस्ट रोजी बालकांचा मृत्यू झाला होता, यामधील मुख्य डॉक्टर डॉ. कफील खान यांना एनआयसीयूच्या प्रमुखपदावरुन हटवण्यात आले होते. मात्र आता सरकारने अजून पुढची कारवाई केली आहे. 

डॉ. कफील हे प्रायव्हेट प्रॅक्टिस करत होते त्यामुळे सरकारने त्यांना या प्रकरणी अटक केली आहे. खान यांच्या पत्नी डॉ. शबिस्ता खान गोरखपूरमध्ये मेडिस्प्रिंग चिल्ड्रन हॉस्पिटल सुरु आहे हे समोर आले आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावे जरी असले तरी तेथे खान रोज काम करत होते असे समोर आले आहे. त्यामुळ पोलिसांनी गुन्हा नोंदवून कारवाई केली आहे.