1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (08:37 IST)

बाप्परे, दिल्लीहून विमानाने आलेले 12 प्रवासी कोरोना बाधित

Corona disrupted
नागपूरमध्ये दिल्लीहून विमानाने आलेले 12 प्रवासी कोरोना बाधित निघाले आहेत. त्यामुळे नागपूर मनपा प्रशासन अलर्ट झाले आहे वाढत्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा येथून विमानाने येणाऱ्या प्रवाशांची संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून नागपूर शहरात आलेल्या अहमदाबाद येथील 24 प्रवासी, दिल्ली येथील 38 प्रवासी, दिल्ली येथील 41 प्रवासी अशा एकूण 103 प्रवाशांकडे चाचणीचा रिपोर्ट नव्हता. या सर्व प्रवाशांची विमानतळावरच चाचणी करण्यात आली. यात 12 प्रवासी कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं.