1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. crores of rupees cash seized from engineers house in Bhubaneswar

अभियंत्याच्या घरात २ कोटींची रोकड सापडली, दक्षता विभागाचे ७ ठिकाणी छापे

ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील एका सरकारी अभियंत्याच्या घरातून दक्षता विभागाने कोट्यवधी रुपयांची रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षता विभागाने राज्यभरात ७ ठिकाणी ही छापे टाकले होते. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील एका राज्य सरकारी अभियंत्याच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. दक्षता विभागाने ही कारवाई केली आहे. छापे टाकण्यासाठी अधिकारी अभियंत्याच्या घरी पोहोचले तेव्हा बैकुंठनाथ सारंगी घाबरले आणि त्यांनी फ्लॅटच्या खिडकीतून रोख रकमेचे गठ्ठे बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. जमिनीवर पडल्यानंतर गठ्ठे मोजण्यात आले आणि ते बॅगेत भरून नेण्यात आले.
दक्षता विभागाच्या म्हणण्यानुसार, भुवनेश्वर, कटक, पुरी आणि बालासोरमध्ये ७ ठिकाणी छापे टाकण्यात आले. तपासादरम्यान, २.१ कोटी रोख रक्कम, महागड्या विद्युत वस्तू आणि फर्निचर, जमीन आणि फ्लॅटची कागदपत्रे, अनेक बँक खात्यांची आणि लॉकर्सची माहिती जप्त करण्यात आली. संपूर्ण कारवाईदरम्यान, विभागाच्या ७ पथकांचा सहभाग होता आणि ५० हून अधिक अधिकारी उपस्थित होते.  
 
पुढील लेख
आषाढी एकादशीला 'या' वाहनांना टोल माफ असणार, एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा