सोमवार, 20 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (09:31 IST)

दहीहंडी उत्सव, थर रचताना चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू

Dahihandi celebration
मुंबईत दहीहंडीचा उत्सवाला गालबोट लागले आहे. धारावीत थर रचताना चक्कर येऊन पडल्याने २७ वर्षीय कुश खंदारे याचा मुत्यू झाला आहे. धारावी बाळ गोपाळ पथकाचा हा गोविंदा होता. सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कुशला सायन रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला लगेच मृत घोषित करण्यात आले.
 
दरम्यान, दहिहंडीसाठी मानवी मनोरे रचताना आतापर्यंत ६० गोविंदा जखमी झाले असून यांपैकी ४० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. यात धारावीतील २७ वर्षाच्या कुश खंदारे या गोंविदाचा मृत्यू झाला आहे. पहिल्या थरावर असताना फिट आल्याने तो थरावरून खाली कोसळला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले होते. पण दाखल केल्यानंतर त्याला लगेच मृत घोषित करण्यात आले.