शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

दाऊदच्या संपत्तीचा आज लिलाव

सर्वात मोठा गुन्हेगार अर्थात दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा आज लिलाव होणार आहे. दाऊदचं मुंबईतलं घर, हॉटेल आणि गेस्ट हाऊससाठी चर्चगेटमधल्या इंडियन मर्चंट चेंबरच्या कार्यालयात बोली लावली जाईल.
 
सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हा लिलाव सुरु होणार आहेत. दाऊदची संपत्ती विकत घेण्यासाठी आतापर्यंत 12 जणांनी महसूल विभागाकडे माहिती मागवली आहे. इच्छुक बंद लिफाफा, स्वत: उपस्थित राहून आणि ई-ऑक्शनमध्ये सहभागी होऊन बोली लावणार आहेत.
 
सरकारने आतापर्यंत अनेकवेळा दाऊदची संपत्ती विकण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळी लिलावाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. मात्र यावेळी दाऊदच्या मुसक्या आवळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत त्याच्या प्रत्येक संपत्तीचा लिलाव केला जाईल, असं सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे.
 
या संपत्तीचा होणार लिलाव?
डांबरवाला बिल्डिंग, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
लिलावाची सुरुवातीची किंमत – 1 कोटी 55 लाख 76 हजार
 
होटल रौनक अफरोज, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
लिलावाची सुरुवातीची किंमत – 1 कोटी 18 लाख 63 हजार
 
शबनम गेस्ट हाऊस, पाकमोडिया स्ट्रीट, मुंबई
लिलावाची सुरुवातीची किंमत – 1 कोटी 21 लाख 43 हजार