1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 24 मे 2022 (15:42 IST)

कोल्ड्रिंकमध्ये मेलेली पाल निघाली ,व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आउटलेट सील

Dead Lizard in a cold drink Outlet seals after video goes viral कोल्ड्रिंकमध्ये पाल निघाली
अहमदाबाद, गुजरातमधील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमधून एका व्यक्तीने व्हिडिओ बनवला आणि व्हायरल झाला. खरं तर, त्या व्यक्तीचा आरोप आहे की त्याने मॅकडोनाल्डमधून घेतलेल्या कोल्ड ड्रिंकमध्ये एक मेलेली पाल निघाली. ग्राहकाने पटकन त्याचा व्हिडीओ बनवला आणि व्हायरल केला. 
 
व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रशासन कारवाईत उतरले आणि अहमदाबाद महानगरपालिका (AMC) ने सोला परिसरातील आउटलेट सील केले. आउटलेट सील करण्यापूर्वी महापालिकेच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याने आउटलेटमधील शीतपेयांचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. या प्रकरणावर अहमदाबाद महापालिकेचे म्हणणे आहे की त्यांच्या परवानगीशिवाय आउटलेट पुन्हा उघडले जाणार नाही. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भार्गव जोशी आणि त्यांचे मित्र सांगत आहेत की त्यांनी मॅकडोनाल्डच्या आउटलेटमधून बर्गर आणि कोल्ड ड्रिंक्स खरेदी केले होते. त्याच्या मित्रानेही कोल्ड्रिंकचे दोन घोट घेतले होते. ग्लास हलवल्यानंतर त्याला मेलेली पाल वर दिसली.
 
भार्गव जोशी व्हिडिओमध्ये सांगत आहेत की, त्यांनी आउटलेट मॅनेजरकडे याबाबत तक्रार केली तेव्हा त्यांनी बिलातील ३०० रुपये परत करणार असल्याचे सांगितले.   
 
आउटलेट सील केल्यानंतर मॅकडोनाल्डकडून या प्रकरणी निवेदनही जारी करण्यात आले आहे. मॅकडोनाल्डने आपल्या निवेदनात म्हटले आहे की ते या घटनेची चौकशी करत आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी वारंवार तपासणी केली आणि काहीही चुकीचे आढळले नाही. तरीही जबाबदार कंपनी असल्याने ते अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करत आहेत.