शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (21:07 IST)

दिल्ली : घरामध्ये महिला आणि तिच्या 4 मुलांचे मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली

राजधानी दिल्लीतील शाहदरा परिसरात एक महिला आणि तिच्या चार मुलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपासही सुरू करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शाहदरा येथील सीमापुरी भागात त्यांच्या घरात एक महिला आणि 4 मुलांचे मृतदेह सापडले आहेत. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.