सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (08:37 IST)

वाचा, दिल्ली- मुंबई महामार्ग प्रकल्पाची महत्वाची बातमी

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दिल्ली- मुंबई महामार्ग  प्रकल्पाचे सध्या जोरात काम सुरु असून लवकरच हा महामार्ग नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा महतत्त्वाकांक्षी महामार्ग 2024 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा केलेली होती.
 
मात्र आता सरकारने यावर जास्त लक्ष दिलेलं असून दोन वर्ष आधीच म्हणजेच 2022 मध्येच हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याची सरकारची योजना आहे. सध्या मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी किमान 20 ते 24 तास लागतात. मात्र या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना याचा मोठा फायदा होणार असून यामध्ये प्रवासाचे जवळपास 8 तास वाचणार आहेत. 1200 किलोमीटरचा हा सध्याचा महामार्ग असून लवकरच नागरिकांना मुंबईवरून दिल्लीला जाण्यासाठी आता केवळ 12 तास खर्च करावे लागणार आहेत.
 
2024 मध्ये देशात सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहेत. त्याआधी 2022 मध्ये हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी सरकारने तयारी सुरु केलेली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.