मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शनिवार, 16 जानेवारी 2021 (13:37 IST)

राम मंदिरासाठी हिरे व्यापार्‍याने दिली 11 कोटींची देणगी

अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी गुजरात सूरतमधील एका हिरे व्यापार्‍याने  11 कोटी रुपयांची देणगी दिली. गोविंदभाई ढोलकीया या हिरे व्यापार्‍याने विश्वहिंदू परिषदेच्या कार्यालयात ही देणगी दिली.

अयोध्येतील राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी शुक्रवारपासून देणगी गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून गोविंदभाई आरएसएसशी संबंधित आहेत.