सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2020 (15:50 IST)

शिवसेनेला काश्मिरमध्ये पुन्हा ३७० कलम हवे आहे का?

शिवसेनेला काश्मिरमध्ये पुन्हा ३७० कलम हवे आहे का? सत्तेसाठी सिद्धांताशी किती समजोता करणार? असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी करत शिवसेनेवर टिप्पणी केली आहे.
 
”शिवसेना नेता संजय राऊत यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील भारत विरोधी “काश्मिर को चाहिये आझादी” निदर्शनाचे समर्थन केले आहे. शिवसेनेला काश्मिर मध्ये पुन्हा 370 कलम हवे आहे का? सत्तेसाठी सिद्धांताशी किती समजोता करणार!!?” असा सवाल सोमय्या यांनी शिवसेनेला ट्विटद्वारे केला आहे.
 
याआधी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराचा निषेध करताना संजय राऊत यांनी रात्रीच्या अंधारात चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर जातात अशा शब्दांत टीका केली आहे.