1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (11:54 IST)

सचिन जोशीला ED नं केली अटक, 100 कोटींचा गैरव्यवहार

ED arrests actor Sachin Joshi in Omkar Group money-laundering case
मुंबई- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सचिन जोशीला ईडीनं अटक केली आहे. सचिनवर 100 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप आहेत.
 
सचिन हा गुटखा किंग म्हणून ओळखले जाणारे जगदीश जोशी यांचा मुलगा आहे. सचिन जोशी आणि ओमकार ग्रुप प्रमोटर्स यांनी तब्बल 100 कोटींचा गैरव्यवहार केला असून या प्रकरणी त्याची 18 तास चौकशी करण्यात आली. चौकशीत अपेक्षित माहिती समोर न अल्यामुळे अखेर त्याला अटक केली आहे.
 
सचिनला ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं मात्र सचिन ईडी कार्यालयात हजर झाला नव्हता. नंतर त्याला चौकशीसाठी दक्षिण मुंबईतील कार्यालयात आणून 18 तास त्याची चौकशी केली गेली नंतर अटक करण्यात आली. ED ने याआधी ओमकार ग्रुपचे चेअरमन कमाल गुप्ता आणि व्यवस्थापकीय संचालक बाबूलाल वर्मा यांना मनी लॉण्डरिंग प्रकरणी अटक केली आहे. 
 

विजय मल्ल्याचा गोव्यामधील किंगफिशर व्हिला खरेदी केल्यामुळे सचिन व्यवसायिक म्हणून पहिल्यांदा प्रकाशझोतात आला होता. त्याचे देशभरात अनेक रेस्तराँ आणि क्लब आहेत.