शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (09:41 IST)

रिक्षाचालकाच्या मुलीने पटकावला Femina Miss India रनर अप चा किताब

मुंबई- तेलंगणा रहिवासी मानसा वाराणसीने फेमिना मिस इंडिया 2020 चा खिताब जिंकला आहे. मुंबईच्या एका हॉटेलात आयोजित या स्पर्धेत उत्तर प्रदेशातील मान्या सिंह फर्स्ट रनर अप आणि मनिका शियोकांड सेकेंड रनर अप ठरली आहे. 
 
या दरम्यान फर्स्ट रनर अप मान्‍या सिंह सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. कारण ती इतरांपेक्षा वेगळं असून संघर्षपूर्ण आहे. मान्या सिंहने सांगितले की येथे पोहचण्यासाठी तिने अनेक ‍दिवस न जेवता आणि न झोपता काढली. 
 
मान्या रिक्षा चालकाची मुलगी असल्यामुळे शाळेत जाण्याची संधी तर मिळालीच नाही वरुन तरुण वयातच तिला काम करावे लागले. मला अभ्याची आवड असल्यामुळे शेवटी माझ्या वडिलांनी आईचे दागिने गहाण ठेवून मला शिकवले. वयाच्या 14 व्या वर्षी घर सोडून मान्याने दिवासाला अभ्यास केला आणि रात्री भांडी घासण्याचे काम. शिवाय ती कॉल सेंटरमध्ये देखील काम करत होती.
 
आज यशाच्या पायरीवर असून तिने याचे श्रेय आई-वडील आणि भावाला दिले. त्यांच्या पाठिंबा होता म्हणून Femina Miss India च्या स्टेजपर्यंत पोहोचू शकली, असे ‍तिने म्हटले. तसेच आपला विश्वास असेल तर स्वप्न नक्कीच पूर्ण होतात असेही ती म्हणाली.