रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

बाबा सिद्दीकीच्या विविध ठिकाणांवर ईडीचे छापे

काँग्रेस नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतील विविध ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 100 कोटींच्या घोटाळ्यात बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या एक सहकारी बिल्डर रफीक मकबूल कुरेशी यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्यावरुनच ही छापेमारी झाली आहे.

बाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेशी यांच्या मिळून 5 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. नियमानुसार वांद्रे परिसरातील झोपडपट्टी विकास करायचा असेल, तर त्यातील एक भाग झोपडपट्टीधारकांसाठी ठेवावा लागतो. मात्र बनावट कागदपत्रं बनवून हा घोटाळा केल्याचा ठपका बाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेशींवर आहे. या छापेमारी दरम्यान बिल्डर रफीक कुरेशी यांच्या कंपनीने बाबा सिद्दीकींच्या कंपनीला पैसे दिल्याचं समोर आलं आहे.