सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 मे 2021 (16:35 IST)

दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना सामना वाचावाच लागतो : संजय राउत

शिवसेनेचे खासदार, प्रवक्ते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नाना पटोलेंना टोला लगावला आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना सामना वाचावाच लागतो अन् धोरणं बदलावीही लागतात. केंद्रातील नेते सामनाची दखल घेतात. त्यामुळे सामना कोण वाचत नाही यावर लक्ष देऊ नका, असा टोला राऊतांनी नाना पटोले यांना लगावला.
 
“कोण काय म्हणतंय, सामना कोण वाचत नाही त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. सामना हा वाचावाच लागतो मग ते दिल्ली असो की गल्ली असेल…त्यानुसार धोरणंही ठरवावी लागतात. सामना काय करु शकतो हे महाराष्ट्रातील सत्तांतरात पाहिलेलं आहे आणि याआधीही पाहिलेलं आहे. आजही सामनाच्या शिरोभागी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव झळकतंय त्यामुळे तीच ताकद सामनाची आहे,” असं संजय राऊत म्हणाले.