सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 25 मे 2024 (20:36 IST)

राजकोटच्या गेम झोनमध्ये भीषण आग, 24 जणांचा मृत्यू,बचावकार्य सुरू

Rajkoat fire
huge fire breaks out in trp game zone of rajkot : राजकोटमधील गेम झोनमध्ये भीषण आग लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामध्ये 24 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शहरातील नाना मौवा भागात असलेल्या गेमझोनमध्ये आग लागली. गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
 
गुजरातमधील राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये संध्याकाळी अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या अपघातात अनेक जण जिवंत जळाले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेपत्ता लोकांबद्दल आम्हाला कोणताही संदेश मिळालेला नाही. तात्पुरती संरचना कोसळल्यामुळे आणि वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे अग्निशमन कार्यात आम्हाला अडचणी येत आहेत.असे अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
टीआरपी गेम झोनमधील आगीच्या घटनेबाबत अग्निशमन केंद्राचे अधिकारी आरए जोबन म्हणाले, "आम्ही नेमक्या संख्येबद्दल काहीही सांगू शकत नाही... आम्ही दोन्ही बाजूंनी मृतदेह खाली आणत आहोत... शोधकार्य सुरू आहे."
 
जरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी महापालिका आणि प्रशासनाला आग लागल्यास तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भूपेंद्र पटेल यांनी X वर पोस्ट केले की, राजकोटच्या गेम झोनमध्ये आग लागल्याच्या घटनेत महापालिका आणि प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
 
Edited by - Priya Dixit