गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अहमदाबाद , बुधवार, 9 डिसेंबर 2020 (09:12 IST)

अहमदाबादामधील केमिकल फॅक्टरीत भीषण आग, दोन युनिट्स जळाली

गुजरातची राजधानी अहमदाबादामधील वटवा भागात स्थित केमिकल कारखान्यांमध्ये भीषण आग लागली. या अपघातात 2 रासायनिक युनिट्स पेटली.
 
अग्निशमन दलाच्या 20 हून अधिक गाड्यांनी काही तासांच्या मेहनतनंतर आग आटोक्यात ठेवली. या अपघातात कोणत्याही प्रकारचे जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
 
मुख्य अग्निशमन दलाचे अधिकारी राजेश भट्ट यांनी सांगितले की ही आग रात्री 1 च्या सुमारास लागली. त्यावर मात केली गेली आहे.