1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (17:48 IST)

फटाका कारखान्याला आग, चार जणांचा होरपळून मृत्यू ; 8 जखमी

Firecracker factory fire kills four; 8 injured  फटाका कारखान्याला आग
तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील एका फटाका कारखान्याच्या कंपाऊंडमध्ये अज्ञात कारणांमुळे आग लागली ज्यामध्ये चार जण ठार आणि आठ जण जखमी झाले. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी व्यक्ती 20 टक्के भाजली आहे, त्यानंतर त्याला दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे.
येथून 30 किमी अंतरावर असलेल्या गावात कारखाना असून या प्रकरणाचा तपास सुरू असून अपघाताचे कारणही शोधले जात असल्याचे त्यांनी सांगितले.