1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Firecracker factory in Siwan Bihar

बिहारमधील सिवान येथील फटाक्यांच्या कारखान्यात आग लागून सात जणांचा मृत्यू

शुक्रवारी बिहारमधील सिवान येथील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागून सात जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सिवानमधील अलमपूर गावातील एका घरात फटाके बनवले जात असताना अचानक एक मोठा स्फोट झाला, ज्यामुळे संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्फोट इतका विनाशकारी होता की, त्याचा आवाज ऐकून लोक घराबाहेर धावले आणि एकच घबराट पसरली.
 
सिवानचे जिल्हाधिकारी विजय प्रकाश मीना यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, ज्या घरात स्फोट झाला, तिथे फटाके साठवलेले होते. अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहे.
पुढील लेख
आयपीएल २०२७ लिलावापूर्वी सीएसकेला मोठा धक्का, आयुष म्हात्रे ३ महिन्यांसाठी संघाबाहेर