प्राण्यांसाठी देशातीले पहिले नेत्र रुग्णालय सुरु
पुण्यात प्राण्यांसाठीचे देशातील पहिले नेत्र रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.‘विवेट मल्टीस्पेशालिटी क्लिनिक’तर्फे बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावर हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. डॉ. कस्तुरी भडसावळे या पशु नेत्रतज्ज्ञ महिलेच्या कल्पनेतून या नेत्र रुग्णालयाची स्थापना झाली आहे.‘द आय वेट’असे या नेत्ररुग्णालयाचे नाव असून श्वान, मांजर अशा पाळीव प्राण्यांबरोबरच इतर सर्व प्राण्यांच्या नेत्रविकारांवर देखील या रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत.
प्राण्यांच्या डोळ्यांची घ्यावयाची काळजी, डोळ्यांवर करण्यात येणाऱ्या मोतीबिंदू आणि इतर शस्त्रक्रिया या नेत्र रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तबेल्याला भेट देऊन घोडय़ांमध्ये आढळणारे दुर्मीळ आणि गुंतागुंतीचे नेत्रविकार हाताळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सहकाऱ्यांची नियुक्ती रुग्णालयात करण्यात आली आहे.