1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (09:06 IST)

तर समाजवादी कॉंग्रेसची पोलखोल करेल : अबू आसीम

Samajwadi Party
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीत मनसेला सामील करून घेतल्यास उत्तर भारतातील सर्व राज्यांच्या प्रचारांत समाजवादी पक्षातर्फे काँग्रेसची पोलखोल करण्याचा इशारा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार अबू आसीम आझमी यांनी दिला आहे. महाआघाडीकडून अद्याप आपल्याला निमंत्रण आले नाही. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात लोकसभेच्या सहा जागा लढवण्याची घोषणा आझमी यांनी यावेळी केली.
 
समाजवादी पक्षाने भिवंडी, मुंबई अथवा नांदेड या तीनपैकी एक जागा मागितली आहे. त्यापैकी भिवंडी लोकसभा हे आमचे पहिले लक्ष्य आहे. आपल्या मागणीचा विचार न झाल्याने समाजवादी पक्ष सहा जागांवर उमेदवार उभे करणार आहे असे त्यांनी सांगितले.