संबंधित माहिती
- वेळेआधीच केरळमध्ये पोहोचलेला मान्सून आता रखडला, महाराष्ट्रात कधी येणार?
- केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात लवकरच धडकणार
- कोरोना अपडेट: केरळमध्ये 24 तासांत 783 नवे रुग्ण आढळले, महाराष्ट्रातही 511 नवे रुग्ण आढळले
- सौंदर्य बाळगणारा केरळचा वर्कला बीच
- मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, सामान्य पावसाचा अंदाज
एकाच कुटुंबातील पाच जण मृतावस्थेत आढळले
केरळमधील कल्लंबलमजवळ शनिवारी सकाळी एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
पोलिसांनी सांगितले की, कुटुंबप्रमुख एका खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला तर इतर चार सदस्य जमिनीवर पडलेले आढळले. त्यांनी विष प्राशन केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मृतांमध्ये कुटुंबप्रमुख ,त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्याशिवाय आणखी एका महिला नातेवाईकाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, "प्राथमिक तापसांती हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे आढळून येते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब काही आर्थिक समस्यांमुळे तणावाखाली होते, परंतु आम्ही तपास करत आहोत, तपासा नंतरच काही निष्कर्ष काढता येईल ."
त्यांनी सांगितले की, या घटनेची बातमी त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली .ते सकाळी कुटुंबातील जवळचे नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले.या प्रकरणात पोलीस तपास करत आहे.