मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 6 जानेवारी 2025 (10:57 IST)

एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून मृत्यू

Death
srinagar news : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील पांद्रेथान परिसरात रविवारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचही जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये वडील, आई आणि त्यांच्या तीन मुलांसह पाच जणांचा समावेश आहे.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. मृत कुटुंब श्रीनगरमधील पांद्रेथान भागात भाड्याच्या घरात राहत होते. कुटुंबातील पाच जण बेशुद्ध झाले आणि गुदमरल्याने त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील पाचही सदस्य गुदमरल्यामुळे घरात बेशुद्धावस्थेत आढळले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. यानंतर सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेचपोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.